भारत चीन युद्ध (1962)
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये अनेक वेळा सीमेवरून वाद निर्माण होत असतात. 1962 मध्येही सीमेवरून वाद निर्माण झालेला दिसतो यामध्ये चीनने भारताचा बहुतांश भाग बेकायदेशीर पणे मिळवलेला दिसतो.
आणि नंतर माघारही घेतलेली दिसून येते.
याला भारत चीन सीमावाद म्हणूनही ओळखले जाते. वादग्रस्त हिमालय हे या युध्दाचे मुख्य कारण मानले जाते, परंतु इतर समस्यांनी देखील यात भूमिका बजावलेली दिसते. चीनमध्ये 1959 च्या तिबेट उठावा नंतर जेव्हा भारताने दलाई लामा यांना आश्रय दिला, तेव्हाही भारत - चीन सीमेवर हिंसक घटनांची मालिका सुरू झाली. 1959 मध्ये चीनचे लष्करी अधिकारी झोऊ ऐनलाई हे होते. Forward policy अंतर्गत mackmohan लाईनच्या सीमेवर भारताने आपली सैन्य चौकी ठेवली.
20 ऑक्टोबर 1962 रोजी,चिनी सैन्याने लडाख आणि mackmohan लाईन ओलांडून एकाच वेळी शस्त्र उल्लंघन केले. त्यानंतर 20 नोव्हेंबर 1962 रोजी चीनने युद्धबंदी जाहीर केली. तसेच वादग्रस्त दोन क्षेत्रा पैकी एका वरून चीनने माघार घेतली. यामुळे त्यावेळेस चा संघर्ष संपला. त्यानंतर थेट हकिन अक्साई चीन येथून भारतीय पोस्ट आणि गस्त काढून टाकण्यात आली.
हे युद्ध कठीण परिस्थितीत लढण्यासाठी उल्लेखनीय आहे. हे युद्ध 4250 मी (14000फूट) पेक्षा जास्त उंचीवर लढले गेले. या युद्धात दोन्ही देशांनी नौदल व हवाई दलाचा वापर केला नव्हता.
written by:- Admin
मैना
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDelete