कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण (online education in covid pandemic)

प्रस्तावना :-
          ऑनलाईन शिक्षण ही संकल्पना या आधुनिक युगाला म्हणजे या तंत्रज्ञान युगाला अनुसरून आहे. कधी असे घडेलही याची कल्पना हि नव्हती,की हि पद्धत आपल्या आयुष्यात अशाप्रकारे येईल. मुळात शिक्षण हि एक मूलभूत गरज आहे,माणसाला आपले आयुष्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक आहेच, पण ऑनलाइन शिक्षण किती आवश्यक आणि अनावश्यक आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

Online education,covid-19,pandemic,lockdown, कोरोना, महामारी,ऑनलाइन शिक्षण.
मागील 2-3 वर्षात अपेक्षित नसलेल्या खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत, जसं की 2019 मध्ये भारतातील किंवा महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा तडाखा बसला होता,त्यामुळं अनेक ठिकाणी पुरस्तिथी निर्माण झाल्याने काही दिवस शाळा बंद कराव्या लागल्या होत्या आणि त्यानंतर काही महिन्यांतच जगासमोर दुसरे संकट येऊन ठाकले,ते म्हणजे कोरोना महामारी (covid19). कोरोनाची पहिली केस चीनमध्ये वुहान या शहरात 2019 ला आढळून आली होती. त्यानंतर कोरोनाचा हळूहळू जगभर फैलाव झाला,ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) ने कोरोना या रोगाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आणि जगातील प्रत्येक राष्ट्राला खबरदारी घेण्याचे आवाहन केले. या रोगावर औषध उपलब्ध नसल्याने अनेक देशांना अगदी lockdown सारखा कठोर निर्णय घ्यावे लागले,त्यावेळी lockdown म्हणजे काय ? हे आमच्या सारख्या सामान्य माणसाला माहीत नव्हते, यामुळे माणसांना lockdown हा इंग्रजी शब्द अवगत झाला आणि या शब्दाला नंतर 2020 या वर्षात सर्वात जास्त वापर झाल्यामुळे lockdown या शब्दाला collins dictionary ने Word Of The Year म्हणून जाहीर केले. असो, आपला मुद्दा lockdown नाही, पण या lockdown मुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीची व्याप्ती जगभर झाली आणि ऑनलाइन शिक्षणाची पद्धत जगाने स्वीकारली. कोरोना महामारी संकटात समाज व्यवस्थेमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. खरंतर माणसाच्या पूर्ण जगण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले आहेत आणि ऑनलाइन शिक्षण हा त्यापैकीच एक.


ऑनलाइन शिक्षण :-
                            मुळात जगामध्ये इंटरनेटची क्रांती झाल्यानंतर ऑनलाइन शिक्षणाला थोडीफार सुरुवात झाली होती. विकसित देशांमध्ये शाळा, महाविद्यालय मध्ये विद्यार्थ्यांना टॅबलेट, कॉम्प्युटर्स पुरविले जातात. हि सुविधा गरीब देशांमध्ये पुरविणे फार मोठे आव्हान आहे, आजही गरीब देशांमध्ये काही मुलांना टॅबलेट, कॉम्प्युटर्स,मोबाईल इ. साधने नसल्यामुळे ते या ऑनलाइन शिक्षणा पासून वंचित आहेत.
                 या शिक्षण पद्धतीत मुलांना एका विशिष्ट ॲप द्वारे (झूम, मीट इ.) एकाच लींक द्वारे जोडले जाते.यातून स्वतःच्या घरून विद्यार्थी शिक्षकांना बघू आणि ऐकू शकतो.शिक्षक सादरीकरणा द्वारे विद्यार्थ्यांना शिकवत असतात.


                 ऑनलाइन शिक्षण हि एक आधुनिक शिक्षणाची नवी पद्धत आहे.ज्यात विद्यार्थ्यांना/ शिक्षकांना शाळेत बसण्याऐवजी घर बसल्या एकमेकांशी संपर्क साधता येतो.तसेच कोचिंगसाठी घराबाहेर न जाता घरातच राहून निश्चितपणे शिक्षण घेता येते.यामुळे लांब शाळा/महाविद्यालय असणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचतो.ऑनलाइन शिक्षणात आपल्या वेळेनुसार आपण उपस्थिती दाखवू शकतो ऑनलाइन शिक्षणामुळे पुस्तके आपण pdf च्या स्वरूपात मोबाईल मध्ये स्टोअर करू शकतो,जेणेकरून आपल्याला ती कधीही आणि कुठेही वाचता येऊ शकतील.
                ऑनलाइन शिक्षणात फायदे आहेतच,परंतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात म्हणजे ऑनलाइन शिक्षणाचे भरपूर फायदे असले तरी याचे वाईट परिणाम ही तितकेच आहेत.आपला देश आर्थिक दृष्टिकोनातून विकसनशील देश आहे.त्यामुळे सर्वांकडे आर्थिक परिस्थितीमुळे इंटरनेट, मोबाईल्स या सुविधा नाहीत त्याच्यामुळे हे विद्यार्थी यापासून वंचित राहिले आहेत आणि देशाच्या अतिदुर्गम भागात तसेच खेडेगावात राहणाऱ्या मुलांसाठी मोबाईल टॉवर्स गावात नसल्यामुळे त्यांना मोबाईल रेंज च्या समस्येला सामोरे जावे लागते यामुळे तेही ऑनलाइन शिक्षणापासून दूर राहतात.
            पूर्वी शाळेत वर्ग भरत असताना मुलांमध्ये शिस्त असायची पण ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्तीची कमतरता निर्माण होते.आधी शाळेत शिक्षकांच्या भयाने मुले लक्ष देऊन शिकवणे ऐकत असत परंतु ऑनलाइन शिक्षणात विद्यार्थी तिकडे बसून काय करत आहे हे कळणे कठीण आहे. काही विद्यार्थी तर ऑनलाइन शिक्षणाला गांभीर्याने घेतच नाहीत,ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे.
           मुलांना फक्त पुस्तकी ज्ञान असून चालत नाही,तर त्यांना प्रात्यक्षिकां सोबत व्यावहारिक ज्ञानाची ही जोड असणं  आवश्यक आहे,परंतु ऑनलाइन शिक्षणामुळे प्रात्यक्षिकांचा अभाव दिसून येतो.
            ऑनलाइन शिक्षणात जास्त उत्साह निर्माण होत नाही,याशिवाय मोबाईल अथवा लॅपटॉप स्क्रीन समोर बसून विद्यार्थ्यांना शारीरिक किंवा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये मोबाईल स्क्रीन मुले डोळ्यांना होणारा त्रास,डोकेदुखी आणि थकवा जाणवणे,चिडचिडेपणा यांसारख्या समस्या निर्माण होतात.घरी बसून शिक्षण होत असल्याने ते आपल्या मित्र मैत्रीणीना भेटू शकत नाहीत, यामुळे त्यांना एकटेपणाची जाणीव होते.ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होण्याची भीती असते.
            वरील दुष्परिणाम आपल्याला जाणवत जरी असले तरी ऑनलाइन शिक्षणाची निंदा करणे योग्य नाही,कारण या वाईट काळात ऑनलाइन शिक्षणानेच मार्ग दाखविला आहे.या पद्धतीमुळेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणास मदत झाली.या पद्धतीत उत्तम सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.जे विद्यार्थी समजूतदार आणि स्वयंशिस्त आहेत त्यांच्यासाठी  ही पद्धत योग्य आहे.परंतु बाल व किशोरवयीन मुलांसाठी काळजी करण्याचे  आहे, कारण या पद्धतीमुळे त्यांचे शिक्षणापासून लक्ष्य विचलित होऊ शकते.पद्धत कोणतीही असो प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय हे आपल्या ज्ञानात वाढ करून आयुष्यात यश मिळविणे हेच असले पाहिजे.
                                                                - धन्यवाद...

            
             

Comments

Popular Posts